हिंदू धर्मामध्ये माता – पित्याची सेवा करणे ही अत्योच्च पूजा मानली जाते. “जेणे जन्म दिला जगती या करू त्यांची सेवा” असं संतवचन आहे. म्हणून शास्त्रामध्ये पितरांचा उद्धार करण्याकरिता पुत्राच ते विहित कर्म आहे असे म्हटले आहे. पुत्र धर्म निभावणे म्हणजे केवळ माता-पिता जिवंत असतानाच त्यांची सेवा करणे असं होत नाही तर मृत्यु उपरांत त्यांचे “श्राद्ध” करणे हा सुद्धा पुत्र धर्मच होय.
मग पितृपक्ष म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे काय? हे आपण थोडक्यात बघूया.पितृपक्ष याचा अर्थ असा की, पितृ म्हणजे पितर (पूर्वज) आणि पक्ष म्हणजे पंधरवाडा. म्हणजेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्या पर्यंत पंधरा दिवस या कालावधीला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा असे म्हणतात.
श्राद्धाच्या प्रक्रियेमध्ये तीन मुख्य क्रिया आहेत:
१) तर्पण
२) पिंडदान
३) ब्राह्मण भोजन
“तर्पण” म्हणजे पितरांना जल प्रदान करून तृप्त करणे. दर अमावस्येला तर्पण करावे असे सांगितले आहे. पण शक्य नसल्यास या पितृपंधरवाड्यामध्ये अवश्य करावे.
“पिंडदान” म्हणजे पितरांना भोजन देणे. जव आणि भात एकत्र करून जी गोलाकृती तयार होते त्याला पिंड असे म्हणतात.
“ब्राह्मण भोजन” – जे लोक मृत्यू उपरांत पितृलोकात जातात त्यांना मंत्राद्वारे बोलविले जाते. ते वायुरूप वास करतात. त्यांना बोलवल्या बरोबर ते श्राद्धदेशात येतात आणि निमंत्रित ब्राह्मणांच्या माध्यमातून भोजन करतात. ते सूक्ष्मग्रही असल्यामुळे भोजनाचे सूक्ष्म कण हेच त्यांचे भोजन असते व ते भोजन ते प्राशन करतात.
अथर्ववेदामध्ये असं सांगितलं आहे की ब्राह्मणाला भोजन दिल्याने ते पितरांना प्राप्त होते. “इममोदनं नि दधे ब्राह्मणेषु विष्टारिणं लोकजितं स्वर्गम्।”(अथर्ववेद ४/३४/८)
“इमम् ओदनम्” म्हणजे ओदन उपलक्षित भोजनाला; “ब्राह्मणेषु नि दधे” म्हणजे ब्राह्मणांमध्ये स्थापित करतो आहे. इथे ‘ब्राह्मण’ म्हणजे जो साऱ्यांमध्ये ब्रह्म पाहतो, तो ब्राह्मण.
पितृपक्षात श्राद्ध का करावे? पितृपक्षासोबत पितरांचा विशेष संबंध आहे. शुक्ल पोर्णिमेपासून पितरांचा दिवस प्रारंभ होतो जो अमावस्या पर्यंत राहतो. शुक्ल पक्ष ही पितरांची रात्र म्हटली आहे. मनुस्मृती मध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा एक मास म्हणजे पितरांची एक रात्र असते. एका मासात दोन पक्ष असतात. मनुष्याचा कृष्णपक्ष पितरांचा कर्माचा दिवस असतो आणि शुक्लपक्ष पितरांची रात्र असते. म्हणून भाद्रपद कृष्ण पक्षांमध्ये पितृ श्राद्ध करायला सांगितले आहे. असं केल्याने पितरांना दररोज भोजन प्राप्त होते.
मग सर्वपितृ अमावस्येला काय करतात? या पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे जी अमावस्या येते त्याला सर्वपितृ अमावस्या म्हणतात. श्राद्ध पक्षात अमावस्याच खूप महत्त्वाची आहे. अश्विन मासातील ही अमावस्या पितरांच्या शांतीचा सर्वात चांगला मुहूर्त मानल्या गेली आहे. ज्यांना आपल्या पितरांचे श्राद्ध त्या त्या तिथीला करता आले नाही त्यांनी या अमावस्येला ते करावे असे सांगितले आहे.
अशा रीतीने या पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध करून त्यांना तृप्त करावे व पूर्ण श्रद्धेने श्राद्ध कर्म संपन्न करावे.
अनुराग देशपांडे
प्रकल्प समन्वयक,
जगद्गुरू श्री देवनाथ वैदिक विज्ञान व अनुसंधान संस्था, नागपूर
मो : 7387519003
anurag.deshpande18@gmail.com
Namaskar Anuragji ,
Tumcha ha lekh khup Chan ahe .
Lokanchya sanka dur hotil ashi apekhsa ahe.
Saral ani sopya bhashet khup changla lihilayes.
सुंदर । छान माहिती।
छान आणि सटीक माहिती।
सुंदर । छान माहिती।
Khup chaan mihiti.Aajchya pidhila he sarv janun ghene garajechey ahey.
सर्वाच्या माहीतीसाठी चांगला ऊपक्रम आहे .
Wa khup chan changli mahiti aahe Anuragji
Hey Anurag,
Very informative and relevant in today’s conditions.
Keep it up ! All the best
Wa chan navin yuva pidhila upayukt mahiti aahe Anuragji
Khup mahatvapurna mahiti..navin pidhila aavashyak
माहीती करीता धन्यवाद. छान लेख.
अभ्यासपूर्ण आध्यात्मिक लेख
धन्यवाद ,अनुरागजी खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल ।
Anuragji lekh Chan lihila ahe. Abhinandan
अतिशय उपयुक्त माहिती. आणखी संदर्भ देता येतील का? उदा. कधीपासून या पंधरवाड्यात करतात , वगैरे.
Valuable and useful information
उत्तम माहीती आणि चांगला उपक्रम ,अशीच माहीती भविष्यात् मिळत् राहो ही अपेक्षा.
धन्यवाद.
अतिशय उपयुक्त आणि अर्थपूर्ण माहिती दिली आहे
धन्यवाद अणुराग
Informative
Information shared by you is really worth….The main concern is to update young generation with many reasons .As young generation do raise question ……why ????
खुपच छान माहिती तत्व सांगितले आहे आनी ब्राम्हण समाजाला देवदूत bnun बरे नाही केले
Chan information mst
Good one Anurag…
अनुरागजी आपण आपल्या लेखात “पितृपक्षाची सुरुवात हि अश्विन कृष्ण प्रतिपदेपासून ” असा उल्लेख केला आहे.
अर्थात कोजागिरी पौर्णिमेनंतर असे आपणास म्हणायचे आहे का ?
छान माहिती !!
परंतु अनुरागजी आपण आपल्या लेखामध्ये “पितृपक्षाची सुरुवात अश्विन कृष्ण प्रतिपदेपासून” असा उल्लेख केला आहे .अर्थात कोजागिरी पौर्णिमेनन्तर येणारा कृष्णपक्ष होतो . हे कळले नाही
कृपया सांगावे
नमस्कार अनुरागजी
छान व महत्त्वाची माहिती तुम्ही येथे दिली.
धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद! अनुराग जी
Chan mahiti anurag ji, ajun post apekshit aahe
खरंच उपयुक्त माहिती आहे.आजच्या पिढीतील मुलांना आवश्यक आहे याबद्दलचे ज्ञान. त्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन . बहुधा चुकून भाद्रपद कृष्ण
च्या ऐवजी अश्विन कृष्ण टाकल्या गेला आहे.
खुप सुंदर लेख आहे. सगळ्यांना हयाचा खुप फायदा होइल.
thank you so much for the post and sharing such important information with us.
थोडक्यात माहिती ठीक आहे
Khupch mast mahiti dilya baddal dhanywad Anurag
Anurag… It’s good to see the informative work done by you… Keep the good work going on.. if possible try to correlate with scientific base. It will add more value. But congratulations for the very good article…
Thank you for your valuable comment .But It is necessary to make young generation aware of the our festivals and traditions.Yes, we can corelate the concept with science but this is just a short and crisp kind of info.
For that we need to explain this concept in detail, which would be very lenghty for this kind of platform. Your suggestions are always welcome.
आजच्या पिढीसाठी अतिशय सोप्या शब्दात उत्तम माहिती आहे . या पिढीला सगळ्या गोष्टींची कारण हवी असतात …असं का करतात . अशीच माहिती भविष्यात देऊन आजच्या पिढीचे समाधान करशील ही अपेक्षा .☺..
धन्यवाद
Ya blog ci kharc garj ho ti
आधुनीक जगातील नव्या पिढीला पितरांच महत्व सोप्या सुलभ भाषेत मांडुन हिंदु संस्कृतीचे जतनास उपयुक्त असे भारदस्त वैचारीक लिखाण
मुकुंद महाजन
अप्रतिम खूप सुंदर माहिती
छान…
Sahaj sopya bhashet pitrupakshachi mahiti sarvana sangitali tyabaddal dhanyavad..hyapudhehi tumachya likhanatun asach labh milava hich sadichha.
सोप्या शब्दात अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली.
अत्यंत महत्त्वपूर्ण लेख , व खूप छान मांडणी । खूप खूप शुभेच्या ।
Congratulations Anurag on starting with the blog! Looking forward to more such informative articles:)
खरोखरच उपयुक्त माहिती समजेल आशय सोप्या भाषेत सांगितली आहे
खुप सुंदर माहिती… छान.