अक्षय्य तृतीया

Marathi:
अक्षय्य तृतीया

उत्सवनाम : अक्षय्य तृतीया
उत्सवकाल : वैशाख शु. तृतीया
  • आचार :
प्रातःकाली स्नानादिद्वारे शुचिर्भूत व्हावे. मंगल वस्त्रे परिधान करून दोन मातीच्या घटांना स्वच्छ त्यामध्ये जल भरावे. दोन्ही घटांना फुलांच्या माला, रेशमी धागा इत्यादिनी अलंकृत करावे. यानंतर दोन्ही देवता व पितर यांचे स्मरण करून तसेच दोन्ही घटांचे पूजन करून त्यांचे यथाविधी दान करावे. या मुहूर्तावर उत्तमोत्तम संकल्प करून नवीन कार्यांना प्रारंभ करावा. तसेच सुवर्ण इत्यादी स्वरूपातील धनलक्ष्मीला घरी आणून तिचेही पूजन करावे.
  • वैज्ञानिक अंतरंग :
1) अक्षय्य व तृतीया : गुढीपाडव्याला शक्तीरूपी उर्जा व चैतन्य यांचे महत्त्व असते. परंतु या दोन्ही गोष्टींना योग्य मार्गी लावल्यासच कल्याणकारी व उत्तम कार्य सम्पन्न होते. याकरिता आवश्यक असतात ते दृढ संकल्प कारण त्यावरच सुरु केलेल्या कार्याचा विस्तार अवलंबून असतो. कमकुवत संकल्प व नियोजन हे कार्याला अपयशाकडे नेतात ज्यामुळे “कार्यक्षय” होतो तर तन, मन व धन या तिन्हींच्या सामर्थ्यशक्तीने युक्त असे नियोजन हे संकल्पपूर्तीद्वारे कार्याला व कर्त्याला अमरत्व प्राप्त करून देतात ज्याला “अक्षय्य स्थिती” असे म्हणतात. प्रस्तुत उत्सव हा याच अक्षय्यत्वाचे व ते साधण्यास उपयुक्त ठरणाऱ्या “तृतीया” म्हणजे तन, मन, व धन या तीन सामर्थ्यशक्तींची जाणीव करून देतात. याचा क्रमाक्रमाने विचार करूयात.

2) कुम्भादींचे दान (शरीरसामर्थ्य तन) : तन म्हणजे शरीर यालाच तनु असेही म्हणतात. “तन्यते, तायते इति तनु |” – जे जीवाचे आवरण होवून त्यास कार्य करण्यास साधन होते, त्यास “तनु” असे म्हणतात तर याचा आश्रय घेणाऱ्याला “तनुभृत” असे म्हणतात. हे आवरण जेवढे बळकट व निरोगी तेवढे परिश्रमास अनुकुलता प्रदान करणारे ठरते.
वैशाख महिन्यात वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. यावेळी वातावरणात विविध बदल घडून येतात. तापमानात वाढ होते आणि शारीरिक उर्जा व शक्तीचा ऱ्हास व झीज होण्यास सुरुवात होते. अशावेळी शरीराला आवश्यक त्या पोषक द्रव्यांचा पुरवठा होणे व त्यास शीतलता प्रदान करणे महत्त्वाचे कार्य ठरते. याचकरिता यावेळी आंबा, टरबूज, पन्हे, सातू इत्यादी विविध फळे, पदार्थ व शीतलता प्रदान करणाऱ्या जलकुंभांचे सेवन व दान केल्या जाते. “शरीरं आद्यं खलु धर्म साधनं |” या उक्तीनुसार निरोगी शरीर व उत्तम आरोग्यप्राप्तीकरिता केलेली उत्तम व्यवस्था याद्वारे केलेली दिसून येते.

3) देवता व पितरांचे पूजन (मनोबलमन) : संकल्पसिद्धी साधून देणारे दुसरे महत्वाचे माध्यम म्हणजे मन होय. मन आणि बुद्धीच्या माध्यमातून मनुष्य विविध नैसर्गिक शक्तींचे ज्ञान करून घेतो, या नैसर्गिक शक्ती म्हणजेच देवता होत ज्यांचे रहस्य व विज्ञान लक्षात घेवून प्रत्यक्ष कृती केली जाते त्याचप्रमाणे ही कृती कुणालाही हानीकारक न ठरता सर्वांना कल्याणकारक होण्यासाठी कर्त्यावर उत्तम संस्कार होणे आवश्यक असतात जे मनावरच होतात. असे संस्कारित  मनच उत्तम मनोरठांचे साधन ठरते.म्हणून यावेळी असा श्लोक म्हणतात,
एष धर्मघटो दत्तो ब्रह्मा विष्णु शिवात्मकः | अस्य प्रदानात् सकला मम सन्तु मनोरथाः||”
आपले पितर व पूर्वज यांचेही पूजन व स्मरण यावेळी केले जाते. कारण त्यांचे पूजन हे त्यांनी केलेल्या कार्यांचे, कर्तृत्वाचे आणि त्यांनी आपल्याला केलेल्या अनुभवी मार्गदर्शन व उपदेशांचे सदैव स्मरण करून देते. त्यांनी दिलेल्या मार्गाचे अनुसरण करणे व त्यांचा सांस्कृतिक वारसा पुढे चालविणे हे सर्वांना हितदायक व त्यांना संतुष्ट करणारे ठरते.त्यांचे पूजन असे केले जाते,
एष धर्मघटो दत्तो ब्रह्मा विष्णु शिवात्मकः | अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ||
याद्वारे उत्साह व मनोबल प्राप्त केले होते.

4)लक्ष्मीपूजन (धन) : हा दिवस भारतीय परंपरेतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून या दिवशी सुवर्ण इत्यादी स्वरूपातील धनलक्ष्मीची खरेदी व पूजन केले जाते. केवळ शरीर व मनाने परिपूर्ण असून चालत नाही तर संकल्पित मनोरथाला मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच भविष्यात त्याचा विस्तार करण्याकरिता धनादि द्रव्यसामर्थ्याचेही तितकेच महत्त्व होय. संकल्पोक्त कर्मांची पूर्तता करण्याकरीता याठिकाणी केले जाणारे धनलक्ष्मीचे आवाहन म्हणजे याची खरेदी असून याचा वर्षभर होणारा नियोजनपूर्वक विनियोग व त्यासंदर्भातील विचार म्हणजेच हिचे पूजन होय. या लक्ष्मीचे पूजन करताना अशी प्रार्थना करतात,
अश्वदायै गोदायै धनदायै महाधने | धनं मे लभतां देवीं सर्व कामांश्च देहि मे ||
विचार : भारतीय तत्त्वचिन्तनानुसार जीव हा या जगात जगन्नाथ होण्याकरिता  म्हणजेच संपूर्ण जगताचे कल्याण करण्याकरीता जन्माला येतो आणि हे कल्याणकारी कार्य पार पाडण्याकरिता त्याला काही मुलभूत घटकांची आवश्यकता असते. जसे अन्न, वस्त्र व निवारा या जगण्याच्या मुलभूत गरजा आहेत तसेच तन, मन व धन या तिन्हींचे होणारे विनियोग हे इतरांसाठी जगण्याचे मुलभूत घटक आहेत.
प्रस्तुत उत्सवाद्वारे या तिन्हींची आवश्यकता तसेच या तिन्ही गोष्टींचे महत्त्व आपल्याला लक्षात येते. प्रकृतीने दिलेलि सर्वात मोठी देणम्हणजे शरीर. त्याचे सुदृढ, सशक्त व निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे होय. यानंतर येणारी दुसरी महत्त्वाची देणगी म्हणजे मन ज्यामुळे आपण मनुष्य म्हणविले जातो.हे मन आपल्याला आपल्या सुप्त शक्तींची व गुणांची जाणीव करून देते. हे मनच बुद्धीने प्राप्त केलेल्या ज्ञानाला संकल्पाद्वारे उत्तम मार्गात अग्रेसर करते आणि ह्या मनावर आपल्या पूर्वजांनी केलेले संस्कारच आपले कल्याण साधून देतात, म्हणून हे अतिशय महत्त्वाचे होय. तिसरा महत्त्वाचा विषय म्हनजे धन, कारण द्रव्य हे कार्याला गती प्रदान करते व त्याचा विस्तार करण्यास सहाय्यभूत ठरते.
अशाप्रकारे केवळ आरंभशूर न होता निश्चित संकल्पाला दृढता प्राप्त होवून योग्य नियोजनाने कल्याणकारी कार्यांची मुहूर्तमेढ रोवण्याचा दिवस म्हणजे “अक्षय्य तृतीया” असून या मार्गाने स्थापित होणारे कार्य हे येणाऱ्या पिढ्यांचेही कल्याण करणारे ठरो व अक्षय्य होवो “अक्षय्यं उपतिष्ठतु” अशी प्रार्थना यावेळी करण्यात येते.

English:

 

अक्षय तृतीया is a festival which is considered as one of the ‘साडे तीन मुहुर्त’ and is celebrated on third lunar day of bright half (shukla paksha) of the spring month Vaishakh. This festival is celebrated since long times all over India which has social as well as cultural significance in the society. But it is important to review the actual purpose behind celebrating the festival today. So, let us discuss the two words – अक्षय” andतृतीया”.

अक्षय तृतीया means three steps towards the अक्षय  state. But what this अक्षय state means?                           

WHAT   IS   अक्षय ?

क्षय  =  The abnormal process by which one goes towards failure and ultimately reaches to the destruction slowly. For example, Tuberculosis is called as क्षयरोग. The bacteria responsible for TB divides every 16 to 20 hours, which is extremely slow rate compared with other bacteria, which usually divide in less than an hour.

 अक्षय  = A vice versa , in which one achieves utmost state of success and happiness ,increasing self-enthusiasm to spread the same.

WHAT ARE THE PARAMETERS TO GAIN THIS अक्षय STATE ?

So, the festival is an answer to this question when we minutely observe at its process and method of how it is celebrated.

1} The drinks (रस) and eatables (अन्न) are given to अतिथी, which help them to pacify and cool their body  from hot summer season.

2}दान, पितृपूजन(remembering forefathers), देवतापूजन(worship of god), यज्ञतप(showing some selfless and sacrificial actions), गोग्रास (regarding bhutdayabhav) etc. duties are carried out.

3} Gold, Silver (धनलक्ष्मी) etc. are purchased especially on this मंगल मुहूर्त  (day).

HENCE THE THREE PARAMETERS ARE:

1] BODY (तन) 2] MIND (मन) 3] WEALTH (धन)

THE EQUILIBRIUM (SAMYAVASTHA) OF THE ABOVE PARAMETERS IS ACHIEVED WHICH RESULTS IN

INCREASE IN ENTHUSIASM AND POSITIVITY WITHIN US

HOW IS THAT POSSIBLE?

Three parameters are said to build carefully at the starting of वसन्तऋतु (first season of year).

A] BODY (तन) –In Sanskrit तन्तन्यते, तायते means to stretch, to cover. Here it implies to healthy food and exercise by which the body can be stretched and can be made powerful. It covers its तनुभृत् i.e. the owner of the body, who lives in it. Hence it is called as तन or तनु, the only medium for any living being to do work. So, the one having strong and healthy body can not only gives him the physical strength but can help others to fight against obstacles.

B] MIND ( मन )-Duties make man responsible .Here , all the above  दान, पूजन etc. duties are performed to promote our mind to become मनस्विन्  and मनीषिण. What these two words mean?

Mind has desires and thoughts, but when they are Resolute and Prudent they are called as मनस्विन् and the wise and intelligent मनस्विन् is called as मनीषिण  .

       So the process which we are going to follow throughout the year is मनस (mind) – मनस्विन् (developed mind )– मनीषिण  (most developed mind).

C] WEALTH (धन) – Generally, it is observed that even if the people are comfortable in their financial conditions, we find them purchasing gold, silver etc on this auspicious day. Why it is like that? It is a belief that purchasing gold and silver means worshiping लक्ष्मी i.e. wealth. But there are two types of wealth i.e. लक्ष्मी and धनलक्ष्मी. लक्ष्मी means wealth of the country which includes our soldiers, scientists, scholars, farmers, doctors, engineers, youngsters etc. While धनलक्ष्मी means gold, silver, money or all the financial means. We only see people inclined towards this धनलक्ष्मी i.e. financial goods and ignoring the लक्ष्मी i.e. the actual wealth of the country listed above. There should be a balance of लक्ष्मी and धनलक्ष्मी for the benefit of the society. Hence, we find lot of inaugurations taking place on this day.

 CONCLUSION 

                    So, the festival is to increase the enthusiasm within us which is the source to achieve success and gain happiness & satisfaction in life. And for this, we need some observations and introspection of our body, mind and wealth (तनमनधन) as mentioned above to achieve the अक्षय state , at least once in a year, which is this festival and we call it as “अक्षय तृतीया .

25 thoughts on “अक्षय्य तृतीया”

  1. Manmohan Dipakrao Ghinmine

    ।।सद्गुरुनाथ महाराज की जय।।

    ।। श्रीनाथ समर्थ।।

  2. Nice explaination Anuragji.Let us all spread the goodness of Akshay tritiya through this nice blog and help the mankind to attain three aspects for successful and happy life.
    Namaskar!!

    1. Anurag Deshpande

      FOR ALL THE READERS:
      I would like to give general info about the blog post of JSDIVSR. The authority of writing blog is with all the board members of JSDIVSR. But the policy is not to disclose the author of any of the blogs which are displayed on our website. So, it is not always me who writes the blog. So, the credit does not goes to me always. Thank you for reading the blogs. Spread this to create awareness about our Sanskriti. Thank You.

      Anurag Deshpande,
      Project Co-ordinator,
      Jagatguru Shri Devnath Institute of Vedic Science and Research.

  3. shrinath pande

    Most of know about अक्षय तृतीया but most of us don’t know the importance of it!
    Excellently explained !!

  4. Sudhir Kuljarni

    Great search for the truth , by these Re-Search Rushies ! This was not known ! But deeper research needed further , with the help of Purified ancient Books . 1200 years of anti-Hindu rule, including 70 years after so called “Independence” ! As an example of what I mean the Britishers could modify Sikhism slowly , painstakingly to make sikhs fight for them in 1857 War of Independence ! Seculars with Breaking India forces just broke Lingayats as a non-Hindu religion in Karnataka !

  5. Govind K Joshi

    I have perused the above blog. Cherished values of the Hindu way of life were never superfluous. They still hold good. Reasoning behind the same have well been elucidated by the blog. I extend my good wishes so also admire the endeavor of the writter.

  6. Priyesh M Anjikar

    Now clear the basic concept of अक्षय… तृतीया…
    Nicely explained…

  7. Mrunalini Waghmare

    उपयुक्त व सकारात्मक माहिती. असेच मार्गदर्शन अाज अपेक्षित

  8. महेश पाठक

    चांगली माहिती। इंग्लिश सोबत मराठी पण अपेक्षित।

  9. Yashodhan Bodhankar

    Nicely written article. Keep up the good work. I shall try my best to spread the word amongst my acquaintances through social media.

  10. Informative, but neither knowledge centred nor inclusive. The observances and the supposed outcomes are highlighted but the methodology to achieve that state of ‘akshay’ is very sketchy and confusing. For instance every one knows the difference between lakshmi and dhanlakshmi, but how can that be instilled as a value to be practiced is not clear.
    Today most people will rather try to achieve only lakshmi at the cost of dhan lakshmi, otherwise one cannot explain the growing gap between the rich and the poor. Everybody is busy asking what the nation is giving them without anyone stating what they are actually giving back to it.

  11. Pradnya Nalawade

    Good explanation of Hindu festival and thier celebration, it has also nicely correlated with the well being of human.

  12. Mangesh Paturkar

    महत्वपूर्ण माहिती…अप्रतिम।
    धन्यवाद!

Comments are closed.